🎓NEHSBatch '93
🏠Home🗓️Event🖼️Gallery📰Articles👥Committees📒Address Book🎉Fun Zone✅RSVP 
← All articles
जरा विसावू,या वळणावर...या वळणावर...माझा जीटी प्रवास...

Memoirs

जरा विसावू,या वळणावर...या वळणावर...माझा जीटी प्रवास...

By सारंग देशपांडे · 6/25/2026

*जरा विसावू,या वळणावर...या वळणावर...माझा जीटी प्रवास...* सूचना: सदर आर्टिकल फार मोठे झाले आहे,तेव्हा ज्यांच्या कडे पेशन्स आहे, त्यांनीच पूढे जावे... काही अपघात झाल्यास मी जवाबदार राहणार नाही...😝😝😝😂😂😂 मित्रांनो बर्याच आपल्या मित्र मैत्रीणीनी स्नेहमेळावा संपल्यानंतर आपआपल्या भावना व्यक्त केल्या...मी सूध्दा माझ्या भावना शव्दातीत करण्याच्या अनूषंगाने हा लेखनप्रपंच...तर माझा हा जीटी चा प्रवास डिसेंबर 25 च्या शेवटी शेवटी सूरू झाला... सोना चा फोन आला... आणि तीने GT ची संपूर्ण कल्पना विस्ताराने सांगीतली आणी सगळ्या क्लास चं जीटी करायचं आहे हे ऐकून मी तर हादरून गेलो होतो... मी सोनाला म्हटलं हे काम म्हणजे रामेश्वर पासून श्रीलंकेपर्यत सेतू बांधण्यासारखं आहे... झेपणार आहे का तूला?(आधीच्या माझ्या बर्याच अनूभवांवरून हा प्रश्न मला पडला होता) त्यावर सोना उत्तरली मी थोडीच एकटी सेतू बांधणार आहे, तूम्ही सगळे *माकडं* 🐒 आहेत ना माझ्या सोबत 😝😝😝...मी तर सरळ उडवून लावला होता विषय त्यानंतर गितीका,आरती या सगळ्यांचं फोन रोज यायला लागले... बायको पण विचारायला लागली... इतक्यात पोरींचे फोन जास्त येतायेत असं नाही वाटत का तूम्हाला? 😝😝😝 चूकली नव्हतीच ती ,मीच चूकलो होतो... 😂 मी माझी चूक लगेच दूरूस्त केली आणि GT साठी confirmation दिलं.... आणि त्यानंतर बायकोने माझ्याकडे लक्ष देणं सोडून दिलं🤪🤪🤪 त्यानंतर सगळा खेळ सूरू झाला... contribution, प्रोग्राम ची रूपरेषा यावरूनच पहीला खटका पडला... आपण सगळ्यांनी ते अनूभवलंच आहे... फक्त भेट घेण्यासाठी पैसे लागत नाही पण इतक्या वर्षांनंतर च्या भेटीची एक सूंदर आठवण करायची तर पैसा हा लागतोच ...हे माझे तेव्हाही ठाम मत होते व आज कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सूध्दा आहे...त्या अनुषंगाने मी ग्रूप वर आपली बाजू मांडत होतो...पण हळूहळू हळूहळू असे वाटायला लागले...आपण का एव्हढं सांगतोय? ...एक संध्याकाळी मला उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त झालं की सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे 😝😝😝 व मी पहील्या ग्रूपवरून जीटी विषयावर सन्यास घेतला...व या माकडाचा सोना ला काहीतरी हातभार लागला पाहीजे या उद्देशाने माझा फोकस चेंज केला... त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने सोना ने अजून एक ग्रूप फार्म केला... हळूहळू एक एक समीती स्थापन होत गेली...काही स्वखूशीने तर काहींच्या अंगी असणार्या नेतृत्व/ कला गूणांच्या जोरावर दूसर्या मित्र/ मैत्रीणींनी सूचवल्या नूसार समीती सदस्य नेमण्यात आले.... contribution जमा करण्यात मोठी जवाबदारी *आरती व गितीका* यांनी पूढाकार घेऊन आपल्या अंगावर घेतली व यशस्वी पार पाडली...आपण 100 लोकांचं टार्गेट घेऊन पुढे मार्गस्थ होतं होतो..पण शेवटी प्रचंड प्रतिसाद मिळत आपला आकडा ऑफिशीअली 110 वर स्थिरावला.... प्रीप्लांनीग मध्ये शाळेची परवानगी घेणे, संपूर्ण कार्यक्रमाच्या रूपरेषेची कल्पना जूगनाके सरांना देणे आणी एक संपूर्ण दिवस शाळा आपल्याला उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी *सोनाली व श्रीरंग* यांनी उत्कृष्ट पणे निभावली. शिक्षकांना संवाद साधण्यात व कार्यक्रमात उपस्थिती निश्चित करण्यात *आरती,गितीका, सोनाली,श्रीरंग व गिरीश तडस* यांचा मोलाचा वाटा होता... कार्यक्रम पत्रिका तयार करणं त्या वेळेत प्रिटींग करणं आणि योग्य वेळेत योग्य ठीकाणी पोहोचवणं हे जीतकं सोपं वाटणारं पण तीतकचं कठीण काम *गिरीश हरबूडे* याने वेळेत करून पूढची धावपळ कमी केली... मधल्या काळात आपला ग्रुपला GT चा विसर पडू नये म्हणून🤪🤪🤪 *सचिन विरमलवार* ने एक countdown question ची कल्पना लढवली व सचिन वयक्तीक कामात व्यस्त झाल्यावर *मिलींद* ने शेवटच्या दिवसापर्यंत ग्रूप ला मजेशीर प्रश्न विचारून वातावरण हलके फूलके ठेवलं... मिलींद च्या नियमते विषयी काय बोलावं🤸एक दिवस प्रवासात असल्यामूळे आपण question post करू शकणार नाही हे जेव्हा त्याने anticipate केले,त्यांच्या आदल्या दिवशी मला मेसेज करून दूसर्या दिवसाचा प्रश्न पाठवून दिला...व पोस्ट करायला सांगितले... उद्देश एकच घेतलेल्या जवाबदारीत खंड पडायला नको...यात जेव्हा सगळा डाटा digitalalize करण्याचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला ,तेव्हा राहूल ठाकरे ने एक सूंदर वेब पेज आपल्या करीता डीझाईन केले... तूम्ही त्या पेजला व्हिजीट करा,अतीशय user friendly आहे..... फक्त तूम्हाला address व फोनं नंबर चा access पाहिजे असेल तर security point of view sign in करावं लागेल, बाकी सगळं तूम्ही विथाऊट लागीन बघू शकता 🙏 आपला जीटी 13 तारखेला होता ,पण माझा वर्धेचा प्रवास 12 तारखेलाच सूरू झाला...शूभाचा सकाळी सकाळी फोन आला तेव्हा मी आष्टीत होतो ...शूभा ने फोनवर आर्डर सोडली ....सगळे घरी जेवायला या रे ...आपण जेवणाला नाही म्हणतच नाही ...🤪🤪🤪 .... शूभाच्या घरच्या भरपेट जेवणानंतर खरं तर डोळ्यांवर बम झापड येतं होती ...मी अन् विवेक ने कलटी मारायचा विचार केला होता त्यात सोनाली ची आर्डर आली...पोट्टेहो शाळेत पोहचा रे साडेचार वाजेपर्यंत...झालं झाला आमचा झोपेचा खोळंबा...रडत रडत😭 पोहचलो बावा शाळेत ...पण शाळेत पोहचतात मन प्रफुल्लित झाले... शाळेत पोहचतात डेकोरेशन कमीटी ने घेतलेली मेहनत डोळ्यांना जाणवायला लागली... सूंदर कमान,त्यावर कल्पकतेने लावलेले बॅनरस्..हाल ची सजावट ... फळ्यावर सूंदर अक्षरांमध्ये शूद्ध मराठीत लीहलेला वेलकम संदेश... प्रत्येक गोष्ट डोळ्यांवर आलेल्या झोपेला पळवून लावत होती...या सर्व गोष्टी मध्ये *अमोल आणी सचिन* ची धावपळ स्पष्ट दिसत होती...काय झालं काय बाकी राहिलं याची *सोनाली,गीतीका* उजळणी घेत होती... त्यानंतर साडेसहा वाजताच्या आसपास cultural event ची रंगीत तालीम सूरू झाली... शारदा ,शूभा ,गिरीश ,नितीन या टेक रिटेक च्या माहौल ने न्यू इंग्लिश चा हाॅल दणाणून सोडला होता... musicians सूद्धा न थकता यांना साथ देत होते... आणी आपल्या विवेक भाउचं या सगळ्यांवर बारकाईने लक्ष होतं 🤪🤪🤪.... पल्लवी ,माधूरी दिपपूजेच्या समई ची तयारी करीत होत्या प्रत्येक जण आपआपल्या वाटून दिलेलं काम पूर्णत्वात नेण्यासाठी जिवतोड मेहनत करत होतं आणी लग्नाच्या आधी वधूपीत्या ला जसं टेन्शन येतं तसं टेन्शन सोना च्या चेहर्यावर दिसत होतं... 13 तारखेला जेव्हा सकाळी 9 वाजता शाळेत पोहचलो...रजीस्ट्रेशन काऊंटर मोगऱ्याच्या सूगंधाने दरवळून आलं होतं... कोणाच्या सूपीक डोक्यातली ही कल्पना होती 🤔पण मस्त... सूंदर आणि प्रसन्न वाटलं...👌👍 ...नास्ताची भट्टी सूध्दा एक नंबर जमली होती...इडलीचा सांबर आणी आलूबोड्याचा रस्सा एक नंबर होते *नितीन* 😋😋😋... नंतरच्या प्रार्थना,राष्ट्रगीत यांच्या मूळे परत एकदा शाळेत आल्याचा फील आला... काही वेळ रजीस्ट्रेशन काऊंटर वर मला आणी नितीन ला बसवण्याची आज्ञा झाली पण त्या गजऱ्यांमूळे आमचा पूरता गोंधळ उडाला 🤪🤪🤪 ...एका सृहृदय मैत्रीणीच्या ते लक्षात आलं... तीने काऊंटर टेकओव्हर केलं व आम्ही दोघांनी सूटकेचा श्वास सोडला 🤪🤪🤪....मूख्य कार्यक्रम तर फारच इमोशनल झाला... पल्लवी व माधूरीचं सूमधूर आवाजातलं सूत्रसंचालन...शिक्षकांचं मनोगत... विवेक, नितीन, गिरीश, माधवी, सोनाली,निता , माधवी किरण आणी इतर बरेच यांच्या संवादाने कार्यक्रमाला चार चांद लावले....👍 या स्नेहमेळावाच्या निमित्ताने आपण एक स्मरणीका सूद्धा प्रकाशीत केली ... खरं तर*स्मरणीका*(Soviner) याची पूर्ण कल्पना ही आरती ची होती...स्मरणीकीचे नाव *स्मृती गंध* हे सूध्दा आरतीनेच सूचवलेलं नाव होतं...नावं एकदम प्रासांगीक होतं... त्यामूळे संपादक मंडळाने ते नाव स्मरणीकेसाठी कायम केलं...आणी नंतर योगायोगाने आपल्या स्नेहमेळ्यावाला सूध्दा आपण तेच नाव दिलं...मित्र/मैत्रीणींनो... जीवनात आठवणी ह्याच महत्वाच्या असतात..आणी शालेय जीवनातील आठवणी ह्याच तर खासच असतात...मन्यूष्य आयूष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पोहचला तरी या आठवणींचा सूगंध नेहमीच त्याला खूणवत असतो...बाते...बाते तो भूल जाती है ...यादे...याद आती है‌...😊 या स्मरणीकेसाठी सूध्दा आपले शिक्षक,मित्र मैत्रिणी यांनी भरघोस प्रतिसाद दिला.... त्याबद्दल काय बोलावं...या स्मरणीकेसाठी महेंद्र, प्रफुल्ल, आरती आणी माधवी यांनी खूप मेहनत घेतली... माझ्या वयक्तीक अडचणी मूळे मी यांना फार साथ देऊ शकलो नाही...पण विशेष म्हणजे महेंद्र आणी प्रफुल्ल यांनी हे काम पूर्णत्वास नेले...पाहिले तर आपण 35 चं कापी छापणार होतो... आमच्या बजेट नूसार...30 ज्यांनी आर्टिकल दिले त्यांच्या आणी 05 extra व बाकीच्यांना soft असं अलमोस्ट all फायनल झालं होतं....पण प्रफुल्ल ने जेव्हा फायनल ड्राफ्ट शेअर केला...तेव्हा ते पाहून वाटलं की मेहनत रंग लायी है...मी विचारत होतो प्रफुल्ल ड्राफ्ट printing ला गेलाय का दोन दिवसांवर प्रोग्राम आलायं... प्रफूल्ल बोलत तर होता पण त्यांच्या बोलण्यात थोडं हेजीटेशनं मला जाणवतं होतं...मी म्हटलं प्रफुल्ल तू क्लीअर सांग काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा तो बोलला सारंग आपण प्रती वाढवू शकतो काय? म्हटलं कीती? तो म्हणाला 85...पण बजेट? मी क्षणभर विचार केला आणी म्हटलं तू draft printing ला दे बघू पूढचं पूढे....कारण त्या वेळी मला यांची मेहनत, यांचं डेडीकेशन आणी यांनी केलेले प्रयत्न डोळ्यासमोर दिसत होते...आज वाटतंय...खरं तर स्मरणीकेच्या 150 प्रती छापायला हव्या होत्या ...आजही आम्ही बर्याच लोकांना हार्ड कापी देऊ शकलो नाही याची आम्हाला मनोगत खंत आहे 🙏😊 ...प्रफुल्ल स्मरणीकेचं प्रास्ताविक करतांना बोलला...की जीटी हे दोनशे रूपयात पण होऊ शकतं...पण जीटी चा जर सोहळा करायचा असेल तर 2000 आवश्यक आहे... आणि आज हा सगळा कार्यक्रम अनूभवल्यानंतर असं म्हणायला काहीच हरकत नाही...मित्रांनो तूम्ही सगळ्यांनी या जीटी चा सोहळाच केला....🙏 हा सगळा कार्यक्रम संपल्यावर सगळे रंगमंदिर परिसरात भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी रवाना झाले... भोजन कमीटी *(नितीन ,निरज,शारदा,मिनल)*ने भोजनाची जय्यत तयारी केली होती...पनीर मसाला,दही वाली तर्री ची फणसाची भाजी,मुगवडा विथ साॅस, आम्रखंड झूनका, भाकरी,चपाती...एका पेक्षा एक सरस मेन्यू आणी त्यांची चवह उत्कृष्ट 👌👌👌 आणि जोडीला आईस गोला...थंडा थंडा ...कूल कूल... जीतना जी भर के चूसना है चूसो...सगळं एक नंबर ....पण सालं लैला मजनू ची उणीव जाणवली 😭... ते लैला मजनू ची भाजी कोणी cancel केली त्याचं नाव सांग रे नितीन... पूढच्या वेळेस वर्धेत आलो की त्यांच्याच घरी जेवायला येणार आहे मी...ड्यू झाली आहे आता ती भाजी त्याच्यावर...😝😝😝 ... यानंतर संध्याकाळी सूरू झाला संगीताचा प्रोग्राम ... दिवसभराच्या धावपळीनंत,जरा मनाला रीफ्रेश करण्यासाठी या प्रोग्राम चे आयोजन होतं...आपलेतच हरहून्नरी कलाकार यात भाग घेणार होते...या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमीत्ताने आपण cultural कमीटी स्थापन केली होती...या कमीटीचे active सदस्य *शूभा, गिरीश,नितीन* यांनी कमी संसाधना मध्ये उत्कृष्ट कार्यक्रम कसा आयोजित करावा याचे चांगले उदाहरण आपल्याला समोर ठेवले आहे...👌👍 कार्यक्रमाची सुरुवात पल्लवी ने म्हटलेल्या शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने झाली...अंगावर शहारे आणणारा performance पल्लवी ने दिला ... जेंव्हा अफजलखान वधाचा सिन पल्लवी गात होती तेव्हा मन डायरेक्ट बोकारे सरांच्या हिस्टरी च्या क्लास मध्ये जाऊन बसलं होतं...♥️सोलो डान्स मधे हरयानवी नृत्य करणारी शितल, मोहे रंग दो लाल यावरचा निताचा जोरदार क्लासीक परफार्मनस् व शिल्पाच्या स्टेजतोड performance ने कार्यक्रमाला हळूहळू चार चांद लावायला सूरूवात केलेली होती... शिल्पा च्या energy level खरंच कौतुक करण्यासारखी आहे...स्टेज वर अडखळून पडल्या नंतर सूध्दा परत त्याच जोमाने न डगमगता, confidence लूज होऊ न देता तीने performance complete करून दाखवीला...Hats off to you, Shilpa 🫡🫡🫡 त्यामुळे मी सकाळी बोललेलो की *हम भी कीसीसे कम नही* यांचं प्रत्यंतर लगेच आलं... त्यानंतर सूरू झाले गाण्यांचे event गिरीश व शारदा ,मंगेश व अपर्णा यांची द्वंद गीते ...शूभांगी व शारदा चं द्वंद गीत...व गिरीश, मंगेश, नितीन, अपर्णा यांनी सोलो गायलेल्या सूमधूर गितांनी आम्हा प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवलं...यात वाईल्ड कार्ड entry सचिन ठाकरे ची झाली...मंझीले अपनी जगह है...रास्ते जगह ...या गाण्यातला दर्द समोर बसलेल्या दर्दी श्रोत्यांपर्यंत पोहचविण्यात सचिन पूर्ण पणे यशस्वी झाला... दोन ग्रूप डान्स व क्लास वाईज Ramp Walk ने हा प्रोगाम एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला....ग्रूप डान्स बसविण्यात अंजली आणि नितीन ने घेतलेली मेहनत स्टेजवर छान रंगली 👌👍👍या संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालन रेवती ने तिच्याकडे शेवटच्या क्षणी येऊन सूध्दा अतीशय सूंदर केलं... तिच्या डिप शायरीने ,... आमच्या हृदयाला डीप पेनीट्रेशन होतंय की काय असं वाटायला लागलं.... 😝😝😝 शेवटी,कढी, खिचडी, आईस्क्रीम ने कार्यक्रमाची सांगता झाली...😋 कोणत्याही कार्यक्रम आयोजित करणं हे एक टिम वर्क असते...आणी इथे तर अख्खी टिमच जीवाभावाची होती... त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हा फक्त कार्यक्रम न राहता सोहळा बनला... Great efforts guys... विल्यम शेक्सपियर ने म्हटले आहे...की *What's in name?* ...गूलाबाला एखादं दूसरं एखादं नावं दिलं तर गूलाबाचा सूगंध थोडीच चेंज होणार आहे? त्यानूसार एखाद्यची मेहनत नोटीस मध्ये नसेलही आली ...तरी त्याची किंवा तीची तेव्हडचं contribution या प्रोग्राम घ्या सक्सेस मध्ये आहे... कारण आम्हाला माहीती आहे back end ला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरपूर मित्र मैत्रीणीं परिश्रम घेत होत्या ....शेवटी ज्या 110 मित्र/मैत्रीणींनी व्यवस्थापन कमीटी वर पूर्ण विश्वास दाखवला व कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली व सोहळ्याचा पूरेपूर आनंद घेतला त्या सर्वांना Thank you...🙏🙏🙏 या अडीच दिवसात वर्धेतल्या ज्या हाॅटेल मध्ये मी थांबलो होतो,तीथे सर्व दिवस वर्धेतील माझ्या मित्रांनी मला बिलकुल एकटे वाटू दिलं नाही , हाँटेलची रूम सदैव पाच सहा लोकांनी भरलेली असायची... त्या हाॅटेल ची receptionist गर्दी मूळे वैतागून गेली होती 😝कदाचीत मी कुठं गायब होतो की काय अशी शंका असावी माझ्या मित्रांना बहूतेक 😝😝😝आणी शितल ने तू मला ओळखतो का ? असा प्रश्न विचारल्या मूळे यांच्या शंकेला अजून हातभार लागला असावा 😝😝😝😝😂😂😂Any way...खूप मजा आली... दोन दिवस मजेत गेलेत... सोना, वेटींग फाॅर नेक्स्ट इव्हेंट 🙈🙉🙊😝 See you Soon...All of You...😎 तूर्तास जरा विसावू,या वळणावर...या वळणावर... 😊